يَا خَلِقَا الْأَكْوَانْ بِا لْلُّطْفِ عَامِلْنِي
हे विश्वांच्या निर्मात्या, माझ्याशी कृपेने वाग.
Mr
Mr
يَا خَلِقَا الْأَكْوَانْ
بِا لْلُّطْفِ عَامِلْنِي
हे अखिल ब्रह्मांडाच्या सृजनहारा
मजवरी तव कृपेचा वर्षाव कर
مَا لِيْ عَمَلْ يُرْضِيْكْ
أَنْتَ الْغَنِيْ عَنِّي
माझ्याजवळ असे कोणतेही कर्म नाही जे तुला प्रसन्न करेल
आणि तू तर माझ्यापासून पूर्णपणे निस्पृह आहेस
يَا وَاهِبَ الْإِحْسَانْ
تَقْوَاكَ أَلْهِمْنِي
हे उपकार करणाऱ्या
तुझ्या ईश-परायणतेने मला प्रेरित कर
قَدْ خَابَ الَّذِيْ يَعْصِيْكْ
سُبْحَانَكَ ارْحَمْنِي
जो तुझी आज्ञा मोडतो तो नक्कीच उद्ध्वस्त होतो
तू महान आहेस, मजवर दया कर
يَا خَلِقَا الْأَكْوَانْ
بِا لْلُّطْفِ عَامِلْنِي
हे अखिल ब्रह्मांडाच्या सृजनहारा
मजवरी तव कृपेचा वर्षाव कर
مَا لِيْ عَمَلْ يُرْضِيْكْ
أَنْتَ الْغَنِيْ عَنِّي
माझ्याजवळ असे कोणतेही कर्म नाही जे तुला प्रसन्न करेल
आणि तू तर माझ्यापासून पूर्णपणे निस्पृह आहेस
بِمَنْ حَوَى الأَنْوَارْ
وَالْفَضْلَ وَالأَسْرَارْ
त्याच्या वाटेने ज्याच्या ठायी सर्व प्रकाश समाविष्ट आहेत
आणि श्रेष्ठता अन् गुपिते सुद्धा
أَحْمَدْ ضِيَا الأَبْصَارْ
مَنْ مَدْحُهُ فَنِِّي
अहमद, जो आमच्या नयनांचा प्रकाश आहे
ज्याची स्तुती करणे हीच माझ्या जीवनाची कला आहे
يَا خَلِقَا الْأَكْوَانْ
بِا لْلُّطْفِ عَامِلْنِي
हे अखिल ब्रह्मांडाच्या सृजनहारा
मजवरी तव कृपेचा वर्षाव कर
مَا لِيْ عَمَلْ يُرْضِيْكْ
أَنْتَ الْغَنِيْ عَنِّي
माझ्याजवळ असे कोणतेही कर्म नाही जे तुला प्रसन्न करेल
आणि तू तर माझ्यापासून पूर्णपणे निस्पृह आहेस
يَا رَبُّ يَا رَحْمَنُ
صَلِّ يَا ذَا المَنِّ
हे प्रभू, हे परम दयाळू
तुझ्या आशिर्वादांचा वर्षाव कर, हे कृपावंता
عَالْرُّوحِ فِي الأَبْدَانْ
وَالْنُّورِ فِي العَيْنِ
देहांमधील त्या आत्म्यावर
आणि डोळ्यांमधील त्या नूरावर
يَا خَلِقَا الْأَكْوَانْ
بِا لْلُّطْفِ عَامِلْنِي
हे अखिल ब्रह्मांडाच्या सृजनहारा
मजवरी तव कृपेचा वर्षाव कर
مَا لِيْ عَمَلْ يُرْضِيْكْ
أَنْتَ الْغَنِيْ عَنِّي
माझ्याजवळ असे कोणतेही कर्म नाही जे तुला प्रसन्न करेल
आणि तू तर माझ्यापासून पूर्णपणे निस्पृह आहेस
مَا شَعْشَعَتْ أَنْوَارْ
مِنْ رَوْضَةِ الْمُخْتَارْ
जोवर ते दिव्य प्रकाश झळकत राहतील
त्या निवडलेल्याच्या (मुस्तफांच्या) उद्यानातून
وَغَرَّدَتْ أَطْيَارْ
تَشْدُو عَلَى الغُصْنِ
आणि जोवर पक्षी किलबिलत राहतील
फांद्यांवर बसून मधुर गुंजन करत