رَبِّي لَهُ الْأَسْمَاءُ الْحُسْنَى
माझ्या प्रभूची सर्वात सुंदर नामे
Mr
رَبِّي لَهُ الْأَسْمَاءُ الْحُسْنَى
تُسَبِّحْ لَهُ الْأكْوَانْ
माझा प्रभू, ज्याची नावे अतिशय सुंदर आहेत
अवघी सृष्टी त्याचेच स्तवन करते
إِلَيْهِ يَرْجِعُ كُلُّ أَمْرٍ
كُلُّ زَمَانٍ وَكُلَّ مَكَانْ
प्रत्येक कार्य त्याच्याकडेच परत जाते
प्रत्येक काळात आणि प्रत्येक स्थळी
إِذَا دَعَوْتْ فَادْعُ الْإِلَهْ
وَإِنِ اسْتَجَرْتَ فَلُذْ بِاللَّهْ
जेव्हा तू प्रार्थना करशील, तेव्हा ईश्वरालाच पुकार
आणि तुला आश्रय हवा असेल तर अल्लाहचीच शरण घे
مَا لَنَا مَوْلًى سِوَاهْ
عَفُوٌّ كَرِيمٌ وَرَحْمَانْ
त्याच्याशिवाय आमचा कोणीही वाली नाही
तो क्षमाशील, उदार आणि परम दयाळू आहे
رَبِّي لَهُ الْأَسْمَاءُ الْحُسْنَى
تُسَبِّحْ لَهُ الْأكْوَانْ
माझा प्रभू, ज्याची नावे अतिशय सुंदर आहेत
अवघी सृष्टी त्याचेच स्तवन करते
إِلَيْهِ يَرْجِعُ كُلُّ أَمْرٍ
كُلُّ زَمَانٍ وَكُلَّ مَكَانْ
प्रत्येक कार्य त्याच्याकडेच परत जाते
प्रत्येक काळात आणि प्रत्येक स्थळी
اتَّقِ اللَّهْ وَلَهُ اِصْبِرْ
فَالْصَّبْرُ فِي الْعُقْبَى حَمِيدْ
ईश्वराचे भय बाळग आणि त्याच्यासाठी संयम राख
कारण संयमाचा शेवट हा नेहमीच प्रशंसनीय असतो
وَتَزَوَّدْ عِلْمًا وَبَيَانًا
مِنَ الْسُّنَّةِ وَالْقُرْآنْ
ज्ञान आणि आकलनाची शिदोरी स्वतःसाठी मिळव
जी सुन्नत आणि कुराण मधून प्राप्त होते